आयुष्यात आपण एका काळात, जिवाच्या आकांताने एखाद्या व्यक्तीसाठी करत राहतो. कोणत्याही वेळी, काहीही कमी पडू नये याची काळजी घेत असतो. अर्थात, आपण सर्वस्व पणाला लावतो मात्र कधीतरी समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यातलं आपल स्थान कमी झालं का? अशी भावना आपल्याला सतावते. गोष्ट छोटी असो वा मोठी जर सतत भांडण होत राहिली तर एक काळ येतो ती व्यक्तीचं नकोशी वाटते किंवा या उलट वेळ जातो तसे आपण हात जोडतो ते नात टिकवण्यासाठी. अशा वेळी दोन शक्यता असतात एक म्हणजे सगळ सोडून जीवन संपवणं आणि दुसरा म्हणजे दुःख पचवून काहीतरी चांगल होईल अशी आशा अंगी बाळगणे.
एक अजून शक्यता असते, जर दोन्ही व्यक्ती खूप समजदार आणि जबाबदार असतील तर एकमेकांना दोष न देता नात पुढे सुरू ठेवतात, मात्र ही शक्यता अतिशय दुर्मिळ. इथे समजदार व्यक्ती, जबाबदारीनं नात फुलवू पाहतात जिथे दोघांच्या मध्ये कोणीच नसत आणि हे नात यशस्वी होत राहतं.
बहुतांशी नात्यांत ज्या दोन शक्यता असतात त्यात निराशा, पराकोटीची फसवणूक झाली असल्याची भावना किंवा आत्मविश्वास गमावल्यामुळे संपून जातात. तर अशा काळी सल्यापेक्षा समुपदेशनाची जास्त गरज असते. कोणी सोबत असण्यापेक्षा कोणीतरी ऐकून घेण्याची जास्त गरज असते. या काळात आपला फक्त वापर झालाय अशी भावना जर बळावू लागली तर माणूस हा अधिक खचतो आणि जर ही भावना कायम दृढ झाली तर आयुष्य संपवण्याचा मकठा निर्णय सुद्धा भावनेच्या आहारी जाऊन घेतला जातो. इथेच सर्वात जास्त लोक आपल्याला आजही अडकलेले दिसतात वेळीच त्यांच्याशी बोलून किंवा त्यांचे समुपदेशन केले तर काही दिवसात यातून ते बाहेर येऊ शकतात.
दुसरी शक्यता, ते म्हणजे आहे ते स्वीकारून दुःख आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत व्यक्त करून लोक यातून बाहेर पडतात. काही लोक काही दिवसांसाठी बाहेर फिरायला जातात, पुन्हा काही कामात बिझी करून गेलेल्या आठवणी विसरायचा प्रयत्न करतात. या काळात मनस्थिती प्रचंड गोंधलेली असते, जेवण, झोप, काम अशा सर्वच गोष्टीतून मन उडून जात तरीही काही काळ गेला की सगळ ठीक होईल या आशेवर ते दिवस जगत असतात. मित्र मंडळींचा आधार सुद्धा यांच्यासाठी महत्त्वाचा असतो, ज्याचा फायदा प्रचंड असतो, एकाकीपण कमी होत जात आणि मुव्ह ऑन होण सोप्प असत.
शेवटी काय, अशावादाच सुंदर गाणं आपली वाट पाहत असत, खरतर हे सोप्प मुळीच नसत मात्र कोणी अनुभवसंपन्न संगीतकार भेटावा तसा कोणीतरी यावा आणि मुव्ह ऑन होता येत.
Write a comment ...