एवेलेबल असलेली माणसं | Game of Love 1

आपल्या गरजा भागवण्यासाठी स्वतःच्या गरजा सोडून एखादा माणूस आपल्यासाठी एवेलेबल असतो पण त्याच्या एखाद्या गरजेवेळी आपण त्याला टाळतो. मग आपली तत्व म्हणून आपण मिरवत असू तर वेळ आपल्यापासून हा माणूस हिरावून घेते.

हा माणूस त्याच्या गरजेसाठी भिकारी नसतो, तो काळजी करणारा असतो. तुम्ही तुमच्या गरजेसाठी माणूस बदलू शकता पण तो माणूस, त्याची काळजी परत कधीच मिळवू शकत नाही. आपल्यासाठी काल एवेलेबल असलेला माणूस आज महत्त्वाचा वाटतं नसेल, तर आपण काय गोंधळ घालतोय स्वतःच्या तत्वांशी? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे.

तो माणूस एवेलेबल असतो, कारण तो तुम्हाला व्हॅल्यूएबल समजतो. ही माणसं जपा, वेळ त्यांना तुमच्यापासून हिरावून घेण्याआधी.

#game_of_love1

Write a comment ...

Write a comment ...